कॅलिफोर्निया येथे राहणारा एक व्यक्ती तरुण आणि फीट राहण्यासाठी स्वत:ला सापाचं इंजेक्शन देत असल्याचे समोर आले आहे.स्टीव लुडविन असे या विष घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. स्टीव गेल्या ३० वर्षांपासून सापाचे विष घेत आहे. वयाच्या १७व्या वर्षापासून त्याने विष घेण्यास केलेली सुरुवात आजही चालू आहे. स्टीवकडे १८ साप आहेत, त्या सापांचे तो विष काढतो. त्याच्यासाठी ही प्रक्रिया अतिशय वेदना दायक असली तरी यात सापांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्याने सांगितले आहे. स्टीव ६ वर्षांचा असताना गेटर नावाच्या सापाने त्याला सर्पदंश केला होता. या दंशाने स्टीवला कोणतेही नुकसान झाले नव्हते मात्र त्याने त्रास झाल्याचे सांगितले. स्टीव १० वर्षांचा असताना एकदा तो बिल हास्ट या व्यक्तीला तो भेटला, हास्ट रेटलस्नेक आणि कोबरा या विषारी सापाचे विष घेत होते. त्यांचा मृत्यू वयाच्या १००व्या वर्षी झाला होता.बिल हास्ट यांच्या भेटीने स्टीव प्रभावित झाला आणि त्याने सुद्धा विष प्राशन करण्यास सर्वात केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews